हा ‘कोकणी मेवा’ अनेक आजारांवर रामबाण उपाय

konkan
फळांचा राजा अशी ओळख असलेला कोकणचा हापूस आंबा याला जगभरातून प्रचंड मागणी आहे आणि आता तर आंब्याचा हंगाम देखील सुरु झाला आहे. कैरीपासून लोणचे, कच्च्या कैरीचा चुंदा, पन्हे, कैरीची आमटी केली जाते. तर आंब्याचे रायते, सरबत, आमरस, साठे, आंबावडी असे अनेक पदार्थ बनवले जातात.
konkan1
रोगप्रतिकारक शक्ती आंबा खाल्ल्यामुळे वाढते. त्वचेची पोत सुधारते. अशक्तपणा कमी होतो. आंबा उष्ण असल्यामुळे तो उपाशीपोटी खाऊ नये. पित्त होण्याचा धोका असतो. शरीरातील उष्णता आंब्याच्या अतिसेवनामुळे वाढते. आमरस जेवणानंतर खाल्ल्याने सुस्ती येते. शुगरचे प्रमाण आंब्यात अधिक असते त्यामुळे ऊर्जा मिळते मात्र मधुमेह असणाऱ्यांनी आंबा खाऊ नये.
konkan2
क जीवनसत्व करवंदामध्ये असते. करवंद त्वचाविकारासाठी फायदेशीर आहे. सायट्रीक अ‍ॅसिड करवंदात असल्यामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर करवंद फायदेशीर आहेत. करवंदाचा गुणधर्म थंड असतो. करवंदाचे वापर लोणचे, सरबत तयार करणे आणि सुकवून खाण्यासाठी केला जातो. अतिप्रमाणात करवंदाचे सेवन केल्यास सर्दी-खोकला होण्याचा धोका असतो. करवंदाचा चीक घशाला लागल्याने घशात खवखव होण्याची शक्यता असते.
Konkan3
थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम लोहाचा फणसामध्ये समावेश असतो. व्हिटॅमिन ए आणि सी जीवनसत्व आपल्याला फणसाच्या गऱ्यांपासून मिळतात. फणसापासून पापडे, कच्च्या फणसाची भाजी, कच्च्या फणसाचे तळलेले गरे, बरक्या फणसापासून इडली(सांजण), फणसपोळी केली जाते. हाडांसाठी फणस गुणकारी असल्याने त्याचे सेवन करावे. फणसाच्या गऱ्यांवर पाणी प्यायल्याने पोटात दुखण्याचा उलटी किंवा मळमळ सुरू होऊ शकते. फणसाची ज्यांना अ‍ॅलर्जी आहे किंवा पचनशक्ती कमजोर आहे अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने फणस खावा.
konkan4
कोकणातील सर्वात आरोग्यदायी फळ कोकम हे आहे. आगळ, सरबत, आमसूल कोकमापासून तयार केले जातं. कोकम हे पित्तशामक आहे. पित्ताचा ज्यांना त्रास होतो त्यांनी रोज एक आमसूल खावे. कोकम आपण आंबटपणा येण्यासाठी जेवणातही चवीनुसार वापरतो.
konkan5
काजू हे कोकणातील अजून एक प्रसिद्ध फळ असून हिरव्या काजूची भाजी, काजूला येणारे फळ म्हणजे बोंडूपासून कोशिंबीर, लोणचे, नुसता बोंडूही बऱ्याचदा खाल्ला जातो. काजूचे शरीरातील ताकद वाढवण्यासाठी सेवन करावे. काजूचा गुणधर्म उष्ण असल्यामुळे अतिप्रमाणात काजूचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते. काजूचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते. बरेच वेळा तोंडात ज्वर येतात, अंगावर फोडही उठतात. त्यामुळे काजूचे सेवन हे योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने करायला हवे.
konkan6
ताडगोळा हे फळ किनारपट्टीच्या ठिकाणी आढळते. ताडगोळा शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी थंडावा निर्माण करण्यास मदत करते. ताडगोळा खाल्ल्याने अशक्तपणाच्या त्रासापासून सुटका मिळते. पाण्याचे जांब या फळामध्ये प्रमाण अधिक असते. जांब या फळाचा गुणधर्म थंड असतो. याला जाम असेही म्हणतात. शरीरात ऊर्जा आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते. नीरा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. डीयाड्रेशनचा त्रास होत नाही. वजन कमी करणाऱ्यांनी मात्र नीराचे सेवन करणे टाळावे.

Leave a Comment