सियाचीन भागात सैनिकांना खाद्यपदार्थ पोहोचविणारे ड्रोन तयार

सियाचीन सारख्या दुर्गम भागात, पहाडी भागात, अरुणाचलच्या दाट जंगलात भारतीय सेनेला आवश्यक वस्तू पोहोचविण्याचे काम चिता हेलीकॉप्टर कडून केले जाते मात्र आता या हेलीकॉप्टरची जागा लवकरच अत्याधुनिक ड्रोन घेणार असून असे ड्रोन हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केले आहे. हे ड्रोन ३० किलो वजनाची सामग्री वाहून नेऊ शकणार आहे. हे ड्रोन जमिनीपासून साडेपाच ते सहा किमी. उंचीवरून उडू शकते.

या ड्रोन मुळे सीमा भागात शत्रूद्वारा जीपीएस ब्लॉक करून ड्रोन पाडण्याची कारवाई सुद्धा शक्य होणार आहे. सियाचीन सारख्या ३.२ किमी उंचीवरील भागात ३० किलो वजनासह उडणारे हे एकमेव ड्रोन असून जून २०२२ पासून हे ड्रोन या कामात सहभागी होणार आहे. या ड्रोनचे वैशिष्ट म्हणजे दिवसा, रात्री, कोणत्याही हवामानात ते संचालित करता येते. २४ तासात तीन वेळा ते उड्डाण करू शकते.

हे ड्रोन सामान्य पेट्रोलवर चालते त्यामुळे सेनेच्या खर्चात बचत होणार आहे. चिता हेलीकॉप्टर एकावेळी २५ किमी सामान नेऊ शकते त्यामुळे खर्च वाढतो. २०० किलो वजनाच्या या ड्रोनचा वेग ताशी १०० किमी असून ३ तास सलग ते उडू शकते.