नाकाचा शेंडा सांगेल तुम्ही खोटे बोलताय

पिनाचिओची कथा तुम्हाला एकून माहिती असेलच. १९ व्या शतकातल्या या कथेतला पिनाचिओ हा इटालियन मुलगा. तो खोटे बोलला की त्याच्या नाकाची लांबी वाढायची. सगळ्याच गोष्टी अगदी धादांत खोट्या नसतात बरं का! पिनाचिओच्या नाकाची लांबी खोटे बोलल्यावर वाढायची यात थोडेफार तथ्य असू शकते. कारण खोटे बोलण्याचा आणि नाकाचा कांहीतरी संबंध आहे हे आता संशोधनातूनच सिद्ध झाले आहे.

ग्रॅनाडा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात हे दिसून आले आहे की खोटे बोलणार्याव माणसाच्या नाकाचा शेंडा गरम होतो. आपण खोटे बोलतोय ते कळू नये अथवा तसा संशयही येऊ नये यासाठी माणसात जी अॅक्झायटी निर्माण होते त्याचा परिणाम म्हणून नाकाच्या शेंड्याचे तपमान वाढते असे या प्रयोगातून आढळले आहे. हा शेंडा थंड करण्यासाठी मोठे बौद्धिक श्रम करावे लागतात असेही संशोधकांना आढळले आहे. थर्मल इमेजिंग कॅमरेर्याातून घेतलेल्या प्रतिमातून ही बाब सिद्ध झाली असून या संशोधनाला पिनाचिओ इफेक्ट असेच नाव देण्यात आले आहे.

Leave a Comment