बॉलीवूड मधले हे काही महागडे घटस्फोट

बॉलीवूड मधील कोट्यवधी खर्चाच्या विवाहांची माहिती नेहमीच प्रसिध्द होत असते. विवाह अविस्मरणीय बनावे म्हणून प्रचंड पैसा खर्च केला जातो. पण त्याचप्रमाणात मग घटस्फोट झाले तर तेही महागडे ठरतात. असेच काही महागडे घटस्फोट कुठले हे पाहू

हृतिक रोशन आणि सुझान खान याचा घटस्फोट केवळ बॉलीवूडच नाही तर जगातल्या महागड्या घटस्फोटात सामील आहे. या घटस्फोटासाठी सुझानने ४०० कोटी रुपये मागितले होते. तिला ३८० कोटी रुपये दिले गेले असे समजते. आमीर खान आणि रीना दत्त यांनी १९८६ मध्ये घराचा विरोध पत्करून लग्न केले पण त्यांचा २००२ मध्ये घटस्फोट झाला. यावेळी आमीरने ५० कोटी रुपये रीनाला दिल्याचे सांगितले जाते.

बॉलीवूडचे हॉट कपल मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्यात घटस्फोटापोटी किती रकमेवर तडजोड झाली याचा अधिकृत आकडा नाही पण १५ कोटी रुपये दिले गेल्याचे सांगितले जाते. आदित्य चोप्राने पत्नी पायल खन्ना बरोबर घटस्फोट घेऊन राणी मुखर्जी शी लग्न केले तेव्हा त्याने पायल ला ५० कोटी दिले असे समजते. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी ११ वर्षानंतर घटस्फोट घेतला तेव्हा करिश्माला १४ कोटी मिळाले शिवाय मुलांच्या देखभालीसाठी संजयला दरमहा १० लाख रुपये द्यावे लागतात असेही समजते.

सैफ अली खान याने १३ वर्षे वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंग हिच्याशी विवाह केला तेव्हा त्याची चांगलीच चर्चा झाली होती. १३ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला तेव्हा सैफने पाच कोटी रुपये दिले होते शिवाय मुलांच्या खर्चासाठी महिन्याला १ लाख रुपये द्यावे लागत होते.