पुण्यात आज रात्रीपासून ‘विकेंड’ लॉकडाऊन दरम्यान काय सुरू काय बंद


पुणे : राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पुण्यात आज रात्री आठ वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी होणार असून सोमवारी सकाळी ७ पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे. पुणेकरांनी या कालावधीत सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

आता पुणे महापालिकेने राज्य सरकारच्या नियमावलीच्या आधारे शहरात नव्याने निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरात सर्व सुरू राहणार असल्याचे आदेश देण्यात आले आहे. यात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण, याचबरोबर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७पर्यंत होणार आहे. पुण्यात याच पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी दिली आहे.

पुण्यातील या सेवा असणार सुरू

 • लसीकरण केंद्र सुरू राहणार
 • सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत पालिका क्षेत्रातील खानावळी, पार्सल मेस सुरू
 • विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षा असल्यास बाहेर पडण्यासाठी परवानगी
 • मेडिकल व औषध विकी सुरु राहणार
 • सकाळी 6 ते 11 वाजे पर्यंत दूध विक्री
 • ऑनलाइन पुरवठा कंपन्या सुरू राहतील
 • केवळ सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणारे मदतनीस, नर्स यांना परवानगी
 • बांधकाम ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना काम सुरू ठेवता येईल.

या सेवा राहणार बंद

 • मद्य विक्री बंद राहील
 • चष्मा दुकाने बंद
 • अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक वाहतूक बंद
 • अत्यावश्यक कारणांसाठी ओला उबेर टॅक्सी सेवा सुरू राहील