अदर पूनावाला यांनी सांगितले लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो याचे कारण


मुंबई: कोरोना प्रतिबंधक घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनीच नागरिकांमध्ये असलेला हा संभ्रम दूर केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अदर पूनावाला यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो? याचे उत्तर दिले आहे. सीरमच्या या कोरोना लसीचे नाव कोव्हिशिल्ड आहे. या लसीमुळे तुम्हाला आजार होण्यापासून रोखले जावू शकणार नाही, ही लस घेतल्यास कोरोनामुळे तुमचा मृत्यू होणार नाही. या लसीमुळे तुम्ही गंभीर आजारापासून वाचू शकाल. त्याचबरोबर 95 टक्के केसेसमध्ये ही लस घेतल्यानंतर तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. ही लस एकप्रकारची बुलेट प्रुफ जॅकेट सारखी आहे. गोळी लागल्यानंतर बुलेट प्रुफ जॅकेटमुळे माणूस मरत नाही, मात्र तुम्हाला थोडे फार डॅमेज होते. जानेवारीपासून आतापर्यंत 4 कोटी लोकांना डोस देण्यात आला आहे. हे लोक रुग्णालयात भरती आहेत का हे पाहावे लागणार असल्याचे आहे, असे पूनावाला म्हणाले.

तुम्हाला या व्हॅक्सिनमुळे आजारच होणार नाही, असे मी कधीच सांगितलेले नाही. लोकांमध्ये कदाचित अशा प्रकारचा समज झाला असावा, त्याबाबत सांगता येत नाही. आज बाजारात अनेक व्हॅक्सिन आहेत. त्या तुमचा संसर्ग होण्यापासून बचाव करत असतील. परंतु ही व्हॅक्सिन तुमची सुरक्षा करते. जागतिक आरोग्य संघटनेनेही या व्हॅक्सिनचे कौतुक केले आहे. त्यामुळेच सर्वांना लसीकरण करून घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. आज अनेक औषधे आहेत जे कधी काळी त्या त्या आजारावर उपयुक्त होते. परंतु आज ती औषधे निकामी ठरत आहेत. मानवाकडून तयार करण्यात आलेली कोणतीच गोष्ट शंभर टक्के योग्य असूच शकत नाही. अनेकदा अनेक गोष्टी काम करतात तर काही वेळा कामच करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यूरोपातून एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सिनवर प्रश्न केले गेले आहेत. त्यांनी त्यावरही प्रतिक्रिया दिली. या व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलच्या आधीच तिचे परिणाम आणि न्यूरॉलॉजिकल परिणामांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता ब्लड क्लॉटिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु, नियामक आणि व्हॅक्सिनची तपासणी करणाऱ्यांना त्याची तपासणी करू द्यावी, त्यानंतर कोणत्या तरी तर्कावर आले पाहिजे. त्यासाठी थोडी कळ सोसली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

व्हॅक्सिनचे उलट परिणामही येत आहेत. पण त्यामागे काही कारणे आहेत. विनाकारण कोणतेही उलट परिणाम होत नसतात. ज्या वयाच्या लोकांना कोरोनाची व्हॅक्सिन दिली, त्यामध्ये ब्लड क्लॉटिंग होणे ही सामान्यबाब आहे. त्यामुळे यूरोपियन देशातील नागरिकांमध्ये अचानक ब्लड क्लॉटिंगचे प्रमाण वाढले का हे पाहिले पाहिजे. परंतु, भारतात ब्लड क्लॉटिंगची एकही केस आढळली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना ज्या लोकांना झाला आहे आणि रुग्णालयात जे भरती आहेत त्यांना कोव्हिडशिल्ड लस देण्यात आली. यात दोन किंवा तीन टक्के नव्हे तर 90 टक्क्याहून अधिक एफिकेसी दिसून आली आहे. तेही केवळ एकाच डोसने, असेही त्यांनी सांगितले.

सध्या आमचा 18 वर्षाखालील 12 वर्षापर्यंतच्या आणि त्याहून कमी वयाच्या मुलांना लस देण्याचा ट्रायल करण्याचा विचार आहे. त्यासाठी आम्ही आतापर्यंत अर्ज केलेला नाही. अमेरिकेत ही ट्रायल सुरू आहे. अधिक काळजी घेऊन भारतातही हे करता येणे शक्य आहे. 12 किंवा 10 वयोगटातील मुलांसाठी ही लस सेफ आहे की नाही हे माहीत होण्यासाठी सहा महिन्याचा काळ जाऊ शकतो. परंतु, लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ति वेगळी असते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही मुलाच्या जीवाशी आपण खेळू शकत नसल्यामुळे त्यांना देण्यात येणारे डोस आणि त्याच्या मात्रेवरही लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.