पनवेलवासियांनों अत्यावश्यक कारणाशिवाय पडाल तर सामोरे जावे लागेल कडक कारवाईला


पनवेल : आजपासून दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन राज्यात सुरु होतो आहे. हा कडक लॉकडाऊन शनिवार आणि रविवार असा दोन दिवस असणार आहे. आज रात्रीपासूनच या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरात विकेंड लॉकडाऊनची नियमावली जारी करण्यात आली आहे. आज रात्री 8 वाजल्यापासून पनवेलमध्येही विकेंड लॉकडाऊनला सुरुवात होत आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त पनवेलमध्ये विकेंड लॉकडाऊनच्या काळात असणार आहेस. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास तुम्हाला कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी त्याबाबत नियमावली जारी केली आहे.

पनवेलमध्ये काय सुरु राहणार?

 • फक्त वैध कारण असणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी.
 • वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा आणि त्याच्याशी निगडीत लोकांना विकेंड लॉकडाऊनमधून सूट.
 • विकेंड लॉकडाऊनमध्ये रुग्णालय, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, मेडिकल, मेडिकल इन्शुरन्स ऑफिस, फार्मा कंपन्या, मेडिकल आणि हेल्थ सर्विस चालू असणार.
 • किराणा, भाजीपाल्याची दुकान, डेअरी, बेकरी, मिठाई खाद्यपदार्थांची दुकानेही सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील.
 • विकेंड लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतुकीतील ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसेस सुरु राहतील.
 • माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना विकेंड लॉकडाऊनमध्ये परवानगी.
 • शेतीशी निगडीत सेवा सुरु राहतील.
 • ई-कॉमर्स सेवा सुरु राहतील.
 • प्रसार माध्यमांना परवानगी असेल.
 • वृत्तपत्रांच्या होम डिलिव्हरीला परवानगी.
 • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या सेवा सुरु राहतील.
 • बांधकाम सुरु राहतील
 • कारखाने सुरु राहतील

पनवेलमध्ये काय बंद राहणार?

 • खासगी वाहने किंवा खासगी बसेस बंद राहतील.
 • विकेंड लॉकडाऊनमध्ये हॉटेलमधील खाद्यपदार्थांची सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुरु असणार आहे. यावेळी कोणत्याही रेस्टॉरंट, बारला आपल्याला आपली ऑर्डर घेण्यासाठी जाता येणार नाही.
 • वॉटर पार्क, क्लब, स्विमिंग पूल, जिम, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स बंद राहतील.
 • वीकेण्ड लॉकडाऊनच्या दरम्यान फळ विक्रेत्यांसह रस्त्यांच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री सुरू ठेवता येतील, परंतू केवळ पार्सल सेवा देता येईल. खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलजवळ उभे राहून खाता येणार नाही.
 • सर्व समुद्र किनारे, उद्याने, सार्वजनिक मैदाने शुक्रवारी रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजेपर्यंत बंद राहतील.