टेस्लाची भारताच्या या तीन शहरात शोरुम्स

अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या भारत प्रवेशाची प्रतीक्षा संपुष्टात आली असून भारतातील तीन शहरात टेस्ला त्याच्या शोरूम साठी जागेच्या शोधात आहे. जानेवारीत टेस्लाने भारतात एका स्थानिक कंपनीची नोंदणी केली होती. ही कंपनी टेस्लाची पहिली मॉडेल ३ सेदान आयात करून भारतात त्यांची विक्री करणार आहे. २०२१ च्या मध्यापर्यंत हे काम सुरु होईल असे समजते.

यासाठी टेस्ला नवी दिल्ली मध्ये २० ते ३० हजार चौरस फुट व्यावसायिक जागा शोधात आहे. मुंबई आणि बंगलोर येथेही कंपनी शोरूम सुरु करणार आहे. त्यासाठी भारताच्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बॉडीचे माजी कार्यकारी मनुज खुराणा यांच्यावर जबाबदारी दिली गेल्याचे सांगितले जात आहे.

टेस्ला साठी भारतातील व्यवसाय प्रवास सहज सोपा नाही. मुळात भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन दिले जात असले तरी चार्जिंग साठी पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर अद्यापी तयार नाही. त्यातही आयात कार्सवर टेस्ला ला भरावा लागणारा कर त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे असे जाणकार सांगतात.