अमेरिकन चीनी दणक्यात खरेदी करताहेत बंदुका

गेले तीन महिने अमेरिकेत गोळीबाराच्या अनेक घटना घडल्याने मुळचे अमेरिकन नसलेल्या नागरिकांत असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. परिणामी हे नागरिक दणकून हत्यारे खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे. एका आकडेवारीनुसार ३ एप्रिल पर्यंत विविध ठिकाणी झालेल्या गोळीबार घटनांत ८०७६ लोक मृत्युमुखी पडले आहेत. नवीन आकडेवारी आणि ट्रेंड नुसार अमेरिकेच्या इतिहासात या काळात सर्वाधिक बंदुका विक्री झाली आहे. त्यात खरेदी करण्याऱ्या ग्राहकात अर्धे आशियाई अमेरिकन आहेत आणि त्यातही चीनी जास्त आहेत.

हेट क्राईम खाली होणाऱ्या गुन्ह्यात असे अमेरीकेबाहेरून आलेले पण आता अमेरिकेचे नागरिक असलेले लोक सहज शिकार होतात. त्यामुळे त्यांना स्वरक्षणासाठी हत्यारांची गरज भासते आहे. अमेरिकेत शस्त्र खरेदीसाठीचे नियम कडक नाहीत. त्यामुळे काही काळापूर्वी शस्त्र खरेदी करण्यास बिचकणारे आशियाई अमेरिकन आता सर्रास शस्त्रखरेदी करत आहेत. त्यातही साउथ एशियन कम्युनिटीवर ज्या प्रमाणात गोळीबार होण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी हे लोक शस्त्र खरेदीला प्राधान्य देत आहेत.

असेही दिसून आले आहे की नागरिकांना करोना काळात जे मदत पॅकेज दिले गेले तेव्हा तोच पैसा शस्त्रखरेदीसाठी वापरला गेला. त्या काळात बंदूक खरेदीत २० टक्के वाढ दिसली. आता दुसरे मदत पॅकेज दिले जाणार आहे आणि त्यामुळे पुन्हा शस्त्रखरेदी वाढेल असा अंदाज शस्त्र विक्रेते व्यक्त करत आहेत. या वर्षी जानेवारी मध्येच ४३ लाख नागरिकांनी शस्त्र परवाना मिळावा म्हणून एफबीआय कडे अर्ज केले आहेत. अमेरिकेत ग्रीन कार्ड असलेले नागरिक शस्त्र खरेदी करू शकतात.