फ्रांस लष्करात लवकरच रोबो कुत्री

फ्रांस सेना लवकरच युद्ध क्षेत्रावर रोबो म्हणजे यांत्रिक कुत्र्यांचा वापर करणार आहे. या रोबो डॉगच्या चाचण्या सध्या घेतल्या जात असून त्या यशस्वी ठरत आहेत. सैनिकांना एखाद्या जागेचा कब्जा घेताना, आक्रमण करताना, रात्री आणि दिवसा सुरक्षा किंवा शहरी युद्धे अश्या सर्व परिस्थितीत या रोबो कुत्र्याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यासाठी तयार केलेल्या रोबो कुत्र्यांना ‘स्पॉट’ असे नाव दिले गेले आहे.

गुगलच्या मालकीच्या अमेरिकन कंपनी बोस्टन डायनामिक्सने हा रोबो कुत्रा तयार केला आहे. त्यात कॅमेरे लावले गेले आहेत आणि रिमोटच्या सहाय्याने तो कंट्रोल करता येतो. त्याला चार पाय आहेत. यामुळे मार्गातील अडचणी तो सहज पार करू शकतो. त्याचे संतुलन चांगले आहे. उखडवाखड भागात सुद्धा हा कुत्रा चांगले काम करू शकतो. या कुत्र्यामुळे सैनिकांची गती थोडी कमी होते पण सुरक्षितता मात्र वाढते आहे असे दिसून आले आहे.

या रोबो कुत्र्याची बॅटरी डाऊन होणे ही थोडी समस्या आहे. पण हा कुत्रा बांधकाम साईट, खाणी, कारखाने, भूमिगत सर्व्हेक्षणे यासाठीही उपयुक्त ठरतो आहे. त्यामुळे लवकरच सेना, पोलीस, संरक्षण आणि शोध मोहिमा यात त्याचा समावेश केला जाणार आहे.