नोकियाने सादर केले दोन मस्त स्मार्टफोन

दीर्घ प्रतिक्षेनंतर एचएमडी ग्लोबलने एक्स सिरीज मधले दोन नोकिया स्मार्टफोन एक्स १० आणि एक्स २० सादर केले आहेत. हे दोन्ही फोन फाईव्ह जी प्रोसेसर सह आहेत.

एक्स १० आणि एक्स २० साठी ६.६७ इंची एफएचडी डिस्प्ले, अँड्राईड ११ ओएस, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० फाईव्ह जी प्रोसेसर दिला गेला आहे. दोन्ही फोनसाठी ४४७० एमएएच ची फास्ट चार्जिंग बॅटरी असून तीन वर्षे ऑपरेटिंग सिस्टीम अपग्रेडेशन दिले जाणार आहे.

एक्स १० साठी ४ आणि ६ जीबी रॅम आणि ६४ तसेच १२८ जीबी स्टोरेज दिले गेले आहे तर एक्स २० साठी ६ व ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. दोन्ही फोन साठी चार कॅमेरे आहेत. पैकी एक्स १० साठी ४८ एमपीचा तर एक्स २० साठी ६४ एमपीचा प्रायमरी कॅमेरा आहे. बाकी तीन कॅमेरे ५ एमपी अल्ट्रा वाईड, २ एमपी डेप्थ सेन्सर, २ एमपी मायक्रोलेन्स आहे. या दोन्ही फोनच्या किमतीचा खुलासा केला गेलेला नाही.