आयपीएल २०२१ चे समालोचन ८ प्रादेशिक भाषांत

यावर्षी तब्बल १०० समालोचक आयपीएल सामन्यांचे धावते वर्णन प्रेक्षकांनी ऐकविणार असून आठ प्रादेशिक भाषातून हे समालोचन केले जाणार आहे. आयपीएल २०२१ चा धुमधडाका सुरु झाला आहे मात्र करोना मुळे स्टेडियम मध्ये प्रेक्षक नाहीत. तरी प्रेक्षकांपर्यंत सामन्याचा रोमांच पोहोचणार आहे तो कॉमेंट्री किंवा समालोचनाच्या माध्यमातून. माजी क्रिकेटपटू आणि कॅप्टन सुनील गावस्कर, गौतम गंभीर, केविन पीटरसन यांचा यात समावेश आहे. हिंदी सहित सात भारतीय भाषांत हे समालोचन केले जात आहे.

गावस्कर यांच्यावर हिंदी आणि इंग्लिश समालोचनाची जबाबदारी आहे. इंग्लिश साठी माजी क्रिकेटपटू रोहन गावस्कर सुनील याना साथ करणार आहे. स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांबरोबरच डिस्ने, हॉट स्टार वरही या मालिकेचे प्रक्षेपण होत आहे.

स्टार स्पोर्ट्सने या संदर्भात केलेल्या जाहिरातीत आयपीएल १४चे समालोचन विविध भाषांत सर्वश्रेष्ठ समालोचक करत असल्याचे म्हटले गेले आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळी, बंगाली आणि मराठी भाषेत हे समालोचन होत आहे. त्यात आकाश चोप्रा, निखिल चोप्रा, गौतम गंभीर, अजित आगरकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल, आर.पी.सिंग, दीप दासगुप्ता यांचा समावेश आहे. या संदर्भात गौतम गंभीर याने गेल्या काही वर्षात हिंदी समालोचन लोकप्रिय बनल्याचे सांगून त्या टीमचा हिस्सा बनण्याची संधी मिळाल्याने समाधानी असल्याचे सांगितले.