उर्वशी रौतेला ठरली टॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री


लवकरच तमिळ चित्रपटसृष्टीत (टॉलीवूड) बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पदार्पण करत आहे. अद्याप तिच्या या चित्रपटाचे नाव जरी ठरायचे असले तरी ही एक सायफाय फिल्म आहे हे मात्र कळत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते सरवनन असणार आहेत. हा चित्रपट बिग बजेट असणार आहे.

‘व्हर्जिन भानुप्रिया’, ‘पागलपंती’, ‘सिंग साब द ग्रेट’, ‘सनम रे’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये उर्वशीने यापूर्वी काम केलेले आहे. तर ‘लव्ह डोस’, ‘बिजली का तार’, ‘तेरी लोड वे’, ‘एक लडकी भीगी भागी सी’ अशा गाण्यांच्या अल्बम्समध्येही ती झळकली आहे. ती आता तमिळ चित्रपटातून दक्षिणेतही आपले चाहते निर्माण करणार आहे.

एका मायक्रोबायोलॉजिस्टची भूमिका या बिग बजेट चित्रपटात उर्वशी साकारणार आहे. हा चित्रपट अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ती काही दिवसांपूर्वीच तिचे सहकलाकार सरवनन याच्यासोबत मनाली येथे चित्रीकरण करताना दिसून आली. यासंदर्भात डिएनएने दिलल्या वृत्तानुसार, उर्वशी रौतेलाने या चित्रपटासाठी १० कोटी रुपये मानधन घेतल्याचे समोर आले आहे. ती आता तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. तत्पूर्वी अशी अफवा होती की, या बिग बजेट चित्रपटात अभिनेत्री आलिया भट काम करणार आहे. पण, चित्रपटाच्या चित्रीकरणाला उर्वशीने सुरुवात केल्यानंतर ही अफवा हवेत विरुन गेली.