सिनेसृष्टीपासून छोट्या पडद्यावरील बहुतांश कलाकार बऱ्यापैकी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते या माध्यमातून सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात.
पण याच दरम्यान त्यांना अनेकदा त्यांच्या कामावरुन, वजनावरुन, कपड्यांवरुन नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जाते. असेच काहीसे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सायंतनी घोषसोबत घडले आहे.
सायंतनीला एका यूजरने इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान तिच्या अंडरगार्मेंटची साइज विचारली होती. त्यानंतर तिने त्या यूजरला चांगलेच फैलावर घेत सुनावले आहे. आता सायंतनीने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.
अंडरगार्मेंटची साईज विचारणाऱ्याला या अभिनेत्रीने चांगलेच घेतले फैलावर
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सायंतनीने लिहिले आहे की, खरच साइज जाणून घेतल्याने काही फरक पडतो का? पुढे तिने बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सुनावले आहे. मानसिक विचारांच्या साइजला बदलायला हवे. प्रत्येक बॉडी टाइपला नॉर्मलाइज करण्याची वेळ आली आहे. या बदलत्या विचारांना मी पाठिंबा देत आहे. तुम्ही देता का?’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
आजवर अनेक मालिकांमध्ये सायंतनीने काम केले आहे. सध्या सब टीव्हीवरील सायंतनी ‘तेरा यार हूं मै’ या लोकप्रिय मालिकेत काम करताना दिसत आहे. यापूर्वी ती ‘बॅरिस्टर बाबू’ या मालिकेत दिसली होती. तसेच तिने एकता कपूरच्या ‘नागिन ४’मध्ये देखील काम केले आहे.