‘डान्स दीवाने ३’चा परिक्षक प्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेशला कोरोनाची लागण


छोट्या पडद्यावरील डान्स दीवाने ३ हा शो दमदार डान्स परफॉर्मन्समुळे सगळीकडे चर्चेत आहे. पण शोच्या सेटवरून गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक बातम्या समोर येत आहे. डान्स दिवाने ३च्या सेटवरील १८ क्रू मेंबरना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान आता या शोचा परिक्षक धर्मेश येलांडेला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे असे डान्स दिवाने ३ या शोमध्ये तीन परिक्षक आहेत तर राघव जुयाल या शोचे सूत्रसंचालन करत आहे. धर्मेशला कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार माधुरी आणि तुषार यांनी कोरोनाची टेस्ट केली, पण ती निगेटिव्ह आली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेशला कोरोना लागण झाल्याची माहिती शोच्या निर्मात्यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस धर्मेश शोमध्ये दिसणार नाही. कारण काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या शोच्या प्रोमोमध्ये धर्मेश दिसत नाही आहे. त्याच्याऐवजी या प्रोमोमध्ये कोरिओग्राफर पुनीत पाठक आणि शक्ति मोहन दिसत आहेत.