मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस


मुंबई – एकीकडे राज्यात सध्या सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दूसरीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राज्यात हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, आज (गुरूवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी यापूर्वी ११ मार्च रोजी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला होता.


आज कोरोना प्रतिबंधक लसीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसरा डोस घेतला. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवरून दिली आहे. यापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यावेळी त्यांनी जे पात्र आहेत, अशा लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते.