धोनी येतोय गुप्तहेर बनून

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी आणखी एका नव्या अवतारात येत आहे. धोनी एंटरटेनमेंट व ब्लॅक व्हाईट ऑरेंज ब्रांड प्रायव्हेट लिमिटेड तर्फे हेरकथा अॅनिमेटेड सिरीज’ कॅप्टन ७’ लवकरच तयार केली जात असल्याचे समजते. धोनीच्या आयुष्यावर आधारित या सिरीज मध्ये माहीचा अॅनिमेटेड अवतार पाहायला मिळणार आहे. या सिरीजच्या प्री प्रॉडक्शनचे काम सुरु झाले आहे.

धोनी या संदर्भात बोलाताना म्हणाला या सिरीजची कथा आणि संकल्पना मस्त आहे. या सिरीज बरोबरच मी क्रिकेट आणि माझे अन्य छंद एन्जॉय करतो आहे. धोनी एंटरप्रायजेसची संचालक व को प्रोड्युसर् साक्षी धोनी सांगते, जेव्हा आमच्यासमोर माहीवर आधारित अॅनिमेशन फिक्शन आले तेव्हा आम्ही त्वरीत होकार दिला. माहीवर यापूर्वी ‘ एमएस धोनी, अनटोल्ड स्टोरी’ नावाचा चित्रपट येऊन गेला आहे. त्यात माहीची भूमिका सुशांतसिंग राजपूत याने केली होती.