काल दिवसभरात तब्बल 1 लाख 15 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली : भारताने कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या बाबतीत सर्व विक्रम मोडलेले असून देशभरात मागील चोवीस तासांत तब्बल 1 लाख 15 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा हा आकडा सध्या परिस्थिती किती गंभीर आहे, याचीच जाणीव करुन देत आहे.

याबाबत आरोग्य मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार काल दिवभरात 630 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर, 59 856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधितांचा हा आकडा पाहता देशात येत्या काळात काही महत्त्वाचे आणि तितकेच कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात.

काही महिन्यांपूर्वी देशात जेव्हा कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाली होती. 8635 नव्या कोरोनाबाधितांची नोंद 1 फेब्रुवारीला करण्यात आली होती. दिवसभरात आढळलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या होती. पण, आताचे चित्र काहीसे धास्तावणारे आहे. आतापर्यंत देशात 25 कोटी 14 लाख लोकांचे सँपल चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.