साहसी ड्रायविंग आणि पर्यटनाचा आनंद, टू इन वन

सुटीच्या दिवशी रोजच्या रामरगाड्यातून थोडा वेळ काढून लॉंग ड्राईव्हवर अनेक जण जातात. त्यात वातावरण बदल, बाहेरच्या पदार्थांची चव घेणे आणि निवांतपणा हा मुख्य उद्देश असतो. पण ज्यांना लॉंग ड्राईव्ह बरोबरच साहस अनुभवायचे आहे त्यांनी काही खास ठिकाणांना भेट द्यायला हवी. भारतात असे अनेक खतरनाक रस्ते आहेत जेथे ड्राईविंगचा कस लागतो पण त्याचवेळी निसर्गाचा आनंद घेता येतो आणि वेगळ्या पर्यटनाची हौस भागविता येते. असे काही मार्ग खास आमच्या वाचकांसाठी

ईशान्य भारतातील राज्ये मुळातच निसर्गाच्या कुशीत वसलेली. त्यातील सिक्किम हे असेच एक राज्य. भटकंतीला अतिशय सेफ. या राज्यातून जातो जुना सिल्क रुट. समुद्रसपाटीपासून ११२०० फुट उंचीवरून जाणाऱ्या या मार्गावर १०० हून अधिक हेअरपिन वळणे आहेत. थ्री लेव्हल झिगझॅग रोड अशीही त्याची ओळख आहे. हिमालयाचे अनुपम सौंदर्य या संपूर्ण रस्त्यावरून अनुभवता येते.

दक्षिणेकडे जाणार असला तर तामिळनाडूतील कोल्ली हिल्सचा विचार करू शकता. हा मार्ग सुद्धा अतिशय खडतर असून केवळ ३० किमीच्या अंतरात ७० हेअरपिन वळणे घ्यावी लागतात. याला मौत की घाटी असेही म्हणतात. पण घनदाट जंगले, खोल दऱ्या आणि सुखद हवामान या प्रवासाचा शीण येऊ देत नाही.

मनाली पासून लेह कडे जाताना लागणारा रोहतांग पास हा आणखी एक मार्ग. अवधड वळणे, उंच पहाड आणि एका बाजूला खोल दरी असलेला हा मार्ग जून ते ऑक्टोबर या काळात आवर्जून आक्रमावा.

जगप्रसिध पेंगोंग सरोवराकडे जाताना लागणारा चान्ग ला पास हा जगातील तीन नंबरचा हायेस्ट मोटरेबल रोड. १७५८६ फुट उंचीवरचा हा रस्ता पार करायला वाघाचे दिल आणि जिगर हवी. अतिशय अरुंद मार्ग, अवघड वळणे, अति थंडी पण प्रदूषण मुक्त असा हा रस्ता एकदा तरी अनुभवता यावा.

यातील बरेच ठिकाणी तुम्ही ड्राईव्ह करणार असाल तर प्रशासनाची पूर्ण परवानगी घ्यावी लागते.