जगातला सर्वाधिक लांबीचा दुधाचा दात, गिनीज मध्ये नोंद

लहान मुलांना प्रथम दुधाचे दात येतात आणि साधारण सातव्या आठव्या वर्षी हे दात पडायला सुरवात होते आणि मग कायमचे दात येतात. लहान मुलांचे दुधाचे दात पडणे याविषयी अनेक कहाण्या सांगितल्या जातात. पडलेला दात रात्री उशीखाली ठेवला तर परी येऊन तो दात घेऊन जाते आणि त्या ऐवजी सोन्याचे नाणे ठेवते ही अशीच एक कथा. कॅनडातील नऊ वर्षाच्या ल्यूक बोल्टन याला मात्र सोन्याचे नाणे नाही पण त्याहूनही मौल्यवान बक्षीस मिळाले आहे.

ल्यूकचा दुधाचा दात आठव्या वर्षी पडला. ल्यूक कॅनडाचा रहिवासी आहे. त्याने हा पडलेला दात सगळ्यांना दाखवायला शो केस मध्ये ठेवला तेव्हा त्याचा दात खुपच लांब असल्याचे लक्षात आले. मग गिनीज बुक कडे त्याची माहिती दिली गेली तेव्हा ल्यूकचा दुधाचा दात जगातील सर्वाधिक लांबीचा दात असल्याचे समोर आले. या दाताची लांबी २.६ सेंटीमीटर आहे आणि हे नवे रेकॉर्ड आहे.

यापूर्वीचे सर्वाधिक लांबीच्या दुधाच्या दाताचे रेकॉर्ड कर्टिस बेरी हिच्या नावावर होते. तिच्या दाताची लांबी होती २.४ सेंटीमीटर.