तस्लीमा नसरीन यांच्यावर जोफ्रा आर्चर भडकला!


इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीबाबत बांगलादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. यावरुन नसरीन यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आता इंग्लंडचे क्रिकेटपटू देखील मोइन अलीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

तस्लीमा नसरीन यांनीही मोईन अलीबाबतच्या ट्विटवरुन जोरदार टीका होत असल्याचं लक्षात येताच आणखी एक ट्विट करत स्पष्टीकरण दिले. विनोद शैलीतून मोईन अलीबाबतचे ट्विट केले होते. पण माझ्या विरोधकांनी त्याचा वाद निर्माण केला. माझ्याबद्दल समाजात घृणा निर्माण व्हावी यासाठीच ते प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरण तस्लीमा नसरीन यांनी दिले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने त्यावर तस्लीमा नसरीन यांच्यावर संताप व्यक्त करत जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

तुम्हाला हा खरंच जोक वाटतो का? यावर कुणीच हसले नाही. या विनोदावर तुम्ही स्वत: देखील हसला नसाल. तर आता कृपा करुन ते ट्विट सर्वात आधी डिलीट करा, असे ट्विट जोफ्रा आर्चरने केले आहे.