बॉलीवुडच्या चिकनी चमेलीला कोरोनाची लागण


राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच कोरोनाने बॉलीवूडलाही विळखा घातला आहे. त्यातच आता बॉलीवूडची चिकनी चमेली अर्थात अभिनेत्री कतरिना कैफलाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे.

आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिने लिहिले आहे की, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी होम क्वारंटाईन आहे. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे तिने म्हटले आहे.

दरम्यान सोमवारी इन्स्टाग्राम अकाऊंट पोस्टद्वारे कतरिना कैफचा कथित प्रियकर अभिनेता विकी कौशलनेही कोरोना झाल्याचे सांगितले होते. त्याने लिहिले होते की, संपूर्ण काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी होम क्वारंटाईन असून मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून काळजी घ्यावी.