टेस्ला शालेय शिक्षण झालेल्या उमेदवारांची करणार भरती

भारतात तसेच अन्य देशातही चांगली नोकरी मिळविण्यासाठी किमान पदवी आवश्यक मानली जात असली तरी अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलेल्यांना विशेष महत्व दिले असून पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना नोकरीत भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्टिन शहरात सुरु होत असलेल्या गोगा कारखान्यात १० हजार स्टाफ भरती सुरु झाली असून ही भरती करताना शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या आणि पुढे शिकण्याची इच्छा असलेल्या तरुणांना प्राधान्य दिले जात आहे. येथे नोकरी मिळविण्यासाठी कॉलेज पदवीची गरज नाही. या प्लांटवर नोकरी करतानाच हे कर्मचारी त्यांचे उच्च शिक्षण घेऊ शकणार आहेत. मस्क यांनी या कंपनीत साडे सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

गेल्या वर्षी ५ हजार कर्मचारी भरती केले जाणार असल्याचे सांगितले गेले होते मात्र या वर्षी ही संख्या दुप्पट केली गेली आहे. कंपनीने अनेक नामवंत विद्यापीठांशी, विद्यालायांशी संपर्क साधला आहे. ज्यांना शिक्षण सुरु ठेऊन टेस्ला मध्ये करियर सुरु करायची इच्छा आहे त्यांची भरती या कंपनीत केली जाणार आहे.