मुकेश अंबानी पेमेंट सर्व्हिस क्षेत्रात उतरणार

रिलायंस उद्योगसमूह आता नवीन व्यवसायात उतरण्याच्या तयारीत असून अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भागीदारीत ‘इन्फोबीम अॅव्हेन्यू’च्या माध्यमातून पेमेंट सेवा व्यवसायाची योजना आखली आहे. त्यासाठी कंपनीने ‘न्यू अम्ब्रेला एन्टीटीचा प्रस्ताव सादर केला आहे. मुख्य म्हणजे या नव्या उद्योगात फेसबुक, गुगल आणि इन्फोबीमला भागीदार केले जाणार असल्याचे समजते. या निमित्ताने रिलायंस नव्या ग्लोबल म्हणजे जागतिक पातळीवरील पेमेंट सर्व्हिस चे स्वप्न साकार करणार आहे.

रिलायंसने न्यू अम्ब्रेलाच्या माध्यमातून विदेशी पेमेंट सेवा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला असल्याचे समजते. ऑपेरेटिंग लायसन्स मिळाले की ही नवी कंपनी प्रसिद्ध व्हिसा आणि मास्टर कार्ड याना टक्कर देऊ शकेल. रिलायंसने न्यू अम्ब्रेला एन्टीटी सह दीर्घ मुदतीचा टर्म प्लान बनविण्यास सुरवात केली असून या कंपनीची प्रमोटर रिलायंस असेलच पण इन्फोबीम अव्हेन्यू, फेसबुक आणि गुगल यांचीही त्यात २०-२०-२० टक्के भागीदारी असेल. रिलायंसची भागीदारी ४० टक्के असेल. या चारी कंपन्यांनी गेल्याच आठवड्यात लायसन्स साठी अर्ज केला आहे.

एकदा लायसन्स मिळाले की चारी कंपन्या मिळून बनलेल्या नव्या कंपनीला भारतात डिजिटल पेमेंट प्रोसेसिंग साठी जास्त स्वायत्तता मिळविण्यासाठी सक्षम केले जाणार आहे. त्यासाठी नवा प्लॅटफॉर्म बनविला जाणार आहे असेही समजते. गेली काही वर्षे भारत डिजिटल अॅडोप्शन मध्ये जगात दोन नंबरवर आहे.