तुम्ही उशीरा का होईना पण मदत केली, रोहित पवारांनी मानले फडणवीसांचे आभार


मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनही गडद होत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लादलेले निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊनला भाजपने पाठिंबा दर्शविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तुम्ही उशीरा का होईना पण मदत केली, यासाठी आभारी असल्याचे यामध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे.


देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकार्य मिळाल्याचे पाहून बरे वाटलं. केंद्राकडील प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचे असेच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा, असा चिमटाही रोहित पवार यांनी काढला. याशिवाय, राज्यात हातावर पोट असलेल्यांसाठी एखादी योजना आणण्याची गरजही रोहित पवार यांनी बोलून दाखविली.