गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आमदाराचा गंभीर आरोप


मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या या निर्णयानंतर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्यांकडे तो सोपवण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.


त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. CBI ने तातडीने आवश्यक कारवाई करावी.