तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगते तुमचे आवडते संगीत

music
कोणाला जुनी गाणी ऐकण्यास आवडते, तर कोणाला अगदी अलीकडच्या काळातील नवी गाणी ऐकणे पसंत असते. कोणाला हिप हॉप, पॉप, तर कोणाला शास्त्रीय संगीत ऐकणे आवडते. काहींना एखादी सुंदर गझल मोहवते, तर एखादा सुंदर अभंग काहींचे मन भारावून टाकणारा असतो. संगीताची प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असली, तरी मनावरील ताण आणि थकवा कमी करण्याचे हे अतिशय प्रभावी माध्यम आहे हे मात्र नक्की. इतकेच नाही, तर आपल्या आवडीचे संगीत आपल्या व्यक्तीमत्वाबद्दलही बरेच काही सांगून जात असते.
music1
ब्रिटनमधील फित्झविलियम विद्यापीठामध्ये अलीकडेच केल्या गेलेल्या संशोधनामध्ये हे निदान करण्यात आले आहे. या संशोधनामध्ये केलेल्या निदानानुसार साधे, आणि मनाला शांती देणारे संगीत एकाने पसंत करणाऱ्या व्यक्ती बहिर्मुखी, म्हणजेच सर्वांशी हसून खेळून बोलणाऱ्या, मनमोकळ्या स्वभावाच्या असतात. अश्या व्यक्ती अतिशय लोकप्रिय असून, यांचे मित्रमंडळही मोठे असते. आपल्या आनंदी स्वभावाने या व्यक्ती इतरांची मने सहज जिंकून घेऊ शकतात.
music2
शास्त्रीय संगीत पसंत करणाऱ्या व्यक्ती मनाने अतिशय कल्पक असल्याचे या शोधामध्ये म्हटले आहे. या व्यक्तींना सतत नवनवीन कल्पना सुचत असतात. तसेच एखादे काम नेहमीच्या पद्दतीने न करता, ते निराळ्या, अनोख्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न या व्यक्ती करीत असतात. शोधकर्त्यांनी असा ही दावा या संशोधनाच्या माध्यामातून केला आहे, की एखाद्या व्यक्तीच्या आवडत्या संगीतावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, याबाबतीत केवळ थोडेफार नाही, तर अतिशय सविस्तर पद्धतीने विवरण देता येऊ शकते. या संदर्भात केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये २०,००० व्यक्तींना समाविष्ट केले गेले होते. या व्यक्तींवर केल्या गेलेल्या प्रयोगांवरून या संशोधनातील निदाने करण्यात आली आहेत.

Leave a Comment