भारतातील टॉप बिझनेसमन किती शिकलेत ?

business
टाटा-अंबानी-बिर्ला सारख्या लोकांना जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये गणल जाते. संपूर्ण देश या लोकांना ओळखतो. पण ते किती शिकले आहेत याची कुणालाच काहीच माहित नाही. एमबीएच्या शिक्षणाकरिता भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी परदेशात गेलेले, पण ते शिक्षण अर्धवट ठेवूनच भारतात परतले. या लोकांनी साधारण डिग्री घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आता ते टॉपचे बिझनेसमन आहेत.
business1
टाटा ग्रूपचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी आर्किटेक्चर अॅण्ड स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून १९६२ मध्ये अमेरिकेच्या कॉरनेल यूनिर्व्हसिटीमधून त्यांनी ही डिग्री घेतली आहे. त्यानंतर १९७५मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अॅडवान्स मॅनेजमेंटची डिग्री घेतली.
business2
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी मुंबई युनिर्व्हसिटीच्या डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UDCT) मधून केमिकल इंजीनिअरिंगमधून पदवी घेतली आहे. येथून पदवी घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी एमबीएच शिक्षण घेण्यासाठी स्टॅनफोर्ड यूनिर्व्हसिटीमध्ये गेले. पण ते आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाही. त्यांनी एका वर्षाने भारतात परत येऊन वडिल धीरूभाई अंबानी यांचा व्यवसाय सांभाळायला सुरूवात केली.
business3
एचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख एचडीएफसी बँकेचे चेअरमन असून दीपक पारेख एक चार्टर्ड अकाऊंटट आहेत. न्यूयॉर्क अनर्स्ट अॅण्ड यंग मॅनेजमेंट कंसल्टंसी सर्विसेससोबत काम करून त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. यानंतर ते भारतात परतले आणि ग्रिंडलेज बँक आणि चेज मॅनहट्टन बँकेसोबत काम सुरू केले.
business4
आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी युनिर्व्हसिटी ऑफ बॉम्बेमधून बी कॉम केले आणि त्यानंतर चार्टर्ड अकाऊंट बनले. त्यानंतर त्यांनी बिझनेस स्कूल ऑफ लंडनमधून एमबीएची पदवी घेऊन आले.
business5
महिन्द्रा अॅण्ड महिन्द्राचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आनंद महिन्द्रा यांनी हार्वर्ड कॉलेज, कॅम्ब्रिजमधून पदवी घेतली आहे. त्यांनी तिथूनच मेकिंगचा कोर्स पूर्ण केला. त्यांनतर हार्वर्ज बिझनेस स्कूल, बोस्टनमधून १९८१मध्ये एमबीएचे शिक्षण घेतले.
business6
भारती एन्टरप्रायजेसचे चेअरमन सुनील भारती मित्तल हे टेलीकॉम टायकून या नावाने ओळखले जातात. सुनील भारती भारती एंटरप्रायजेसचे चेअरमन आणि ग्रुप सीईओ आहेत. पंजाब यूनिर्व्हसिटीमधून त्यांनी १९७६मध्ये पदवी घेतली आहे. त्यांनी त्यानंतर बॅचलर ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सची डिग्री घेतली. वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी कामाला सुरूवात केली. तसेच ते हार्वर्ड बिझनेस स्कूल, यूएसएचे विद्यार्थी आहेत.
business7
इन्फोसिसचे माजी चेअरमन एनआर नारायण मूर्ती यांनी १९६७ मध्ये यूनिर्व्हसिटी ऑफ मैसूरमधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री घेतल्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमधून १९६९मध्ये मास्टर डिग्री घेतली.
business8
विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी यांनी स्टॅनफोर्ड यूनिर्व्हसिटी, यूएसएमधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगमध्ये डिग्री घेतली. त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला गेले. पण ते २१ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी त्यांनतर शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतले.
business9
एचसीएलचे फाऊंडर आणि चेअरमन शिव नादर यांनी द अमेरिकन कॉलेज, मदुरै मधून प्री युनिर्व्हसिटी डिग्री घेतली. त्यानंतर पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे.
business10
बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी १९८८मध्ये युनिर्व्हसिटी ऑफ पुणेमधून मेकॅनिकल इंजीनिअरिंगची डिग्री घेतली. त्यांनी १९९०मध्ये यूनिर्व्हसिटी ऑफ वॉर्विकमधून मॅन्यूफॅक्चरिंग सिस्टम इंजिनिअरिंगमधून डिग्री घेतली.

Leave a Comment