बॉलिवूडचा ‘खिलाडी’ कुमार कोरोनाच्या विळख्यात


आता हळूहळू बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती अक्षयने स्वत: ट्वीट करुन दिली आहे. सध्या अक्षय होम क्वॉरंटाईन आहे.

ट्वीट करत अक्षय कुमारने सांगितले की, आज सकाळी माझी कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी घरी क्वॉरंटाईन झालो आहे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे. विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि स्वत: ची काळजी घ्यावी.

तत्पूर्वी आलिया भट्ट, रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, क्रिती सेनन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.