‘या’ महिलेच्या वयाचा अंदाज तुम्ही बांधूच शकत नाही


सोळा वर्षांच्या तरुणीसारखे सुंदर ऐन पन्नाशीच्या काळात दिसणे जवळपास अशक्य गोष्ट असून पण या जगात अशक्य असे काहीच नाही म्हणतात ना नेमके तेच इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या या महिलेने करुन दाखवले आहे.

तिच्या या सुंदर दिसण्यावरून तिचे नेमके वय काय असेल असा अंदाज बांधणे देखील अनेकदा अवघड जाते. तिला कित्येक जण कॉलेज कुमारी समजतात. तर ती आपल्या मुलांसोबत अनेकदा बाहेर गेली की त्यांची प्रेयसी समजण्याची चूक करून बसतात. त्यामुळे सतत सोशल मीडियावर चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या या महिलेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये आहे.

पुष्पा देवी असे या महिलेचे नाव असून सध्या तिचे वय आहे ५० वर्षे आहे. पण तिने अद्यापही आपले तारुण्य चांगल्या पद्धतीने राखले आहे. ती पेश्याने व्यावसायिक असून ती HadiGenetics या नावाने आपला व्यवसाय चालवते. इंडोनेशियामधील टीव्हीवरील काही कार्यक्रम आणि चर्चासत्रामध्ये अनेकदा ती सहभागी होत असते. त्यामुळे ती एव्हाना सगळ्यांच्या परिचयाची झाली आहे.

तब्बल २ लाख ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स इन्स्टग्रामवर तिचे आहेत. पुष्पाला दोन मुले असून त्यांचे वय २० वर्षांहून अधिक असल्यामुळे पुष्पा जेव्हा आपल्या दोन मुलांसोबत बाहेर जाते त्यावेळी दोघांनाही प्रेमी युगुल समजण्याची चूक अनेक जण करतात. पण मी हे सारे खूप एन्जॉय करते असे पुष्पा म्हणते. माझ्या तारुण्याचे रहस्य योग्य आहार, व्यायाम हे असल्याचे पुष्पा मोठ्या अभिमानाने सांगते.

Leave a Comment