जाणून घ्या जगातील सर्वाधिक व्याभिचारी १० देशांबद्दल

affairs
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विवाहित स्त्रीसोबत परपुरुषाने विवाहबाह्य शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर शिक्षेची तरतूद असलेले कलम रद्द करणे म्हणजे देशातील विवाह संस्था नष्ट करण्यासारखे असल्याची बाजू मांडली होती. विवाह हा विवाह संस्थेत पवित्र मानला जातो. विवाह सारख्या पावित्र्याला व्याभिचारी वाढल्याने धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह संस्था सामाजिक आणि सांस्कृतिक संरचना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. कलम ४९७ नुसार विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यास शिक्षा केली जात होती.

सर्वोच्च न्यायालयात काल विवाहबाह्य संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान व्याभिचार हा गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले की, पुरुषाने विवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा नाही. घटस्फोटासाठी व्यभिचार हा कारण ठरू शकेल, पण गुन्हा नाही. आम्ही आज तुम्हाला जगातील सर्वाधिक १० व्याभिचारी देशांबद्दल सांगणार आहोत.

थायलंड हा जगातील सर्वाधिक व्याभिचारी देश असून थाई नागरिक जगात सर्वाधिक आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ नसतात, असे अभ्यासातून समोर आले आहे. थायलंडचे आणखी एक वैशिष्टे म्हणजे, पॅटपोंग हा जिल्हा वेश्या व्यवसायासंदर्भात जगातील सर्वात मोठा जिल्हा आहे. ‘सेक्स इंडस्ट्री’ असेही या जिल्ह्याला म्हणतात. थायलंडमध्ये बहुपत्नी व्यवस्था होती. श्रीमंत व्यक्तींकडे अनेक पत्नी असायच्या. आजही या देशात विवाहबाह्य संबंधाला अधिक गांभिर्याने घेतले जात नाही.

स्कॅन्डीनेवियन नागरिकाची उच्च दर्जाचे राहणीमान अशी ओळख आहे. पण डेन्मार्कच्या प्रतिष्ठेला कोपनहेगन शहराने धक्का बसला आहे. कारण, अलीकडच्या काळात कोपनहेगन या शहराची संपूर्ण युरोपमध्ये ओळख पोर्न आणि सेक्स राजधानी म्हणून निर्माण झाली आहे. सेक्स हा येथील लोकांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरत नाही. आपल्या इच्छेनुसार स्त्री-पुरूष जोडीदार ठरवत असतात.

अल्पवयीन मुलींना पैसे देऊन इटलीतील एखादा नेता शारीरिक संबंध ठेवतो आणि त्याला शिक्षाही होते. पण इटालियन नागरिकांना या घटनेमुळे थोडाही धक्का बसला नाही किंवा देशाच्या प्रतिष्ठेबद्दलही कुणाला काहीही वाटले नाही. इटली व्याभिचाराच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे घटस्फोटाची प्रक्रिया सोपी आहे.

जर्मनीने पर स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवण्यामध्ये फ्रान्सला मागे टाकले. पण जर्मनीचे लोक दुसऱ्या स्त्रीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना खूप विचार करतात, असे निरीक्षण समोर आले होते. या देशातील जवळपास ४० टक्के पुरूषांनी इतर स्त्रियांशी संभोग केल्याचे कबुल केले आहे.

प्रेमाची भाषा म्हणून फ्रेंच भाषेला ओळखले जाते. खुल्या विचाराचे येथील नागरिक असतात. फ्रान्सच्या नागरिकांना सेक्ससंदर्भात सभ्य म्हटले जाते, असे असताना ते जोडीदारांना धोका देण्यातही आघाडीवर असतात. जोडीदार विश्वासावर टिकतात, असा विश्वासही येथील नागरिक व्यक्त करतात. पण विवाहबाह्य संबंध असल्याचे अनेकजन उघडपणे सांगतात. फ्रान्सचा व्याभिचारात पाचवा क्रमांक लागतो.

‘मिडनाईट सन’ असे नॉर्वेला म्हणतात. व्हिक्टोरिया मिलन या वेबसाईटवर अफेरसंदर्भातील नोंदणीची संख्या वाढली आहे. नोंदणी करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक विवाहीत पुरूष असल्याचे आढळून आले आहे. या देशात विवाहबाह्य संबंध ठेवण्यास काहीही हरकत घेतली जात नाही.

ऑनलाईन विवाहबाह्य रेलिशन जोडून देणाऱ्या वेबसाईटची बेल्जियममध्ये चर्चा जोरात सुरू आहे. सुमारे १.१ दशलक्ष सदस्यांनी या वेबसाईटवर नोंदणी केली आहे. बेल्जियममध्ये १० टक्के स्त्री-पुरूषांना विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करायला आवडतो, असे समोर आले आहे.

कॅथोलिक पंथाला धरून स्पेन देशाची परंपरा असून येथे विवाह आणि घटस्फोट कायदा स्वतंत्र आहे. सर्वात जास्त घटस्फोट स्पेनमध्ये घेतले जातात. येथील धार्मिक तत्त्वानुसार विवाहबाह्य संबंध मान्य नाहीत. तरीही येथील नागरिकांमध्ये घटस्फोट घेणे आणि विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

नैतिकता आणि सेक्स या विषयावर ब्रिटनमधील नागरिकांची अनेक सर्वेक्षणे करण्यात आली. ब्रिटन नागरिक या दोन्ही प्रकरणात दोषी आढळून आले आहेत. ब्रिटनमधील बहुतांश नागरिक विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केल्याचे कबूल करतात.

तांत्रिकदृष्ट्या फिनलँडमधील नागरिक फसवणूक करीत नाहीत, अशी चर्चा असते. त्यांचा जोडीदारांमध्ये संमातर संबंधावर विश्वास असतो. येथील लोक सेक्सकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असतात. त्यामुळे सेक्ससाठी ओपन स्पेस तयार होतो. फिनलँडचा व्याभिचाऱ्यांच्या १० देशांच्या क्रमवारीत शेवटचा क्रमांक लागतो.

Leave a Comment