या टिप्स वापरा आणि कमी करा एसीचे बिल

AC
उन्हाळ्याची झळ आता सगळ्यानाच बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यात असहाय्य होणाऱ्या उन्हामुळे अनेक जण थंड पेय पितात तर काहीजण एसीमध्येच किंवा पंख्या खाली बसून राहणे पसंत करतात. त्यातच ज्यांच्या घरी एसी आहे अशांच्या घरातील एसी हा दिवस चालू असतो. त्यांना एसी लावून त्यात बसणे जरी चांगले वाटत असले तरी महिन्याच्या शेवटी येणारे बिल पाहून त्यांना उन्हामुळे येणार नाही एवढा घाम येतो. पण आम्ही आज तुम्हाला बिल कमी कसे येईल याबाबत सांगणार आहोत. चला जाणून घेऊ काय आहेत त्या टिप्स…
AC1
वेळोवेळी एसीच्या फिल्टरला साफ करा. त्यात धूळ जमा होते. धूळ जमा झाल्याने काँप्रेसरवर प्रेशर येतो आणि वीज जास्त लागते. एसी आणि पंखा एकत्र सुरू करू नका. यामुळे रूम लवकर थंड होईल असे अनेक जणांना वाटते. पण तसे काही होत नाही. उलट पंखा लावल्याने एसीची थंड हवा बाहेर फेकली जाते आणि एसी पुन्हा ऑन होतो. तेव्हा दोन्ही उपकरणे एका वेळी सुरू करू नका. एसीबरोबर तुम्हाला पंख्याचीही हवा हवी असेल तर टेबल फॅन सुरू करा. तो तुमच्या शरीरावर थंड वारा सोडेल आणि एसी अख्खी रूम थंड करेल. एसी 22 ते 24 वर ठेवा. त्याहून कमी ठेवला तर जास्त वीज खर्च होते.

Leave a Comment