या देशात चक्क दगडाने ठेचून मारण्याची दिली जाते शिक्षा

brunai
ब्रुनेईचे हुकुमशहा सुलतान हस्सानल हे आपल्या अमानवीय कायद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. या देशात त्यांनी अंमलात आणलेल्या कायद्यालाच क्रमप्राप्त महत्व आहे. पण सध्या या देशात दिल्या जाणाऱ्या शिक्षेबद्दल जगभरातून टीका होत आहे. ब्रुनेईमध्ये समलिंगी संबंध, गर्भपात हे गुन्हे मानले जातात आणि या गुन्ह्यांना अमानवी शिक्षा ठोठावण्यात येते. दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेचा अवलंब ब्रुनेईने केल्यामुळे या देशावर जगभरातून टीका होते आहे.
brunai1
शरियत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ब्रुनेई की सुलतान हस्सानल बोल्कियाह यांनी ही शिक्षा दिली आहे. शरियतनुसार ही शिक्षा योग्य आहे का ? या दंडसंहितमुळे ब्रुनेईवर जगभरातून टीका होते आहे. येथे समलिंगी संबंध हा गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे.
brunai2
याच प्रकारची शिक्षा विवाहबाह्य संबंध आणि गर्भपाताच्या गुन्ह्यांमध्येही केली जाते. ही शिक्षा ब्रुनेई या देशाने घोषित केल्यामुळे जगभरातून या देशावर टीका होते आहे. ब्रुनेईचे हे सुलतान सर्वाधिक काळ या पदावर राहणारे सुलतान आहेत. त्यांनी या शिक्षेचा अंमल केला आहे.

Leave a Comment