टाळेबंदींच्या शक्यतेमुळे मजुरांनी धरली गावची वाट


मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन केले जात असल्यामुळे जनतेच्या मनामध्ये धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच अनेकांच्या नोकऱ्या लॉकडाऊनमुळे गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नको असल्याच्या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दररोज लांब पल्ल्याच्या 20 गाड्या एलटीटी टर्मिनसमधून चालविण्यात येत आहेत. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पटणाकरिता धावतात. यामध्ये मजुरांची संख्या मोठ्या आहे.