हिमाचलमधील सात शेतकरी कन्या बनल्या फुटबॉलपटू  

हिमाचल प्रदेशातील शेतकरी कन्यांनी फुटबॉल मध्ये नवा इतिहास लिहिला आहे. या सात मुलीना व्यावसायिक फुटबॉल क्लब कडून खेळण्याची संधी प्रथमच मिळाली आहे. इंडियन वूमन लीग मध्ये त्या टेक्ट्रो स्वदेशी युनायटेड क्लब कडून खेळणार आहेत. हिमाचल प्रदेश फुटबॉल संघाचे मिडिया समन्वयक सत्यदेव शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

रिया शर्मा, प्रेरणा दत्ता, मिनू दत्ता, हर्षिता, प्रवीण व सुरैय्या यांची निवड वरील क्लबने केली आहे. प्रशिक्षण शिबिरासाठी त्या हरियाणाला रवाना झाल्या आहेत. ५ ते १५ एप्रिल दरम्यान दिल्लीच्या नेहरू स्टेडियम मध्ये होणाऱ्या इंडियन वूमन लीग मध्ये त्या खेळणार आहेत. हरियाणातील गर्ल्स फुटबॉल अकादमी मध्ये सध्या १०० हून अधिक मुली फुटबॉलचे प्रशिक्षण घेत आहेत. ही अकादमी सुरु झाली तेव्हा येथील मुली एखाद्या व्यावसायिक फुटबॉल क्लब कडून खेळातील अशी कल्पना नव्हती असेही शर्मा म्हणाले

टेक्ट्रो स्वदेशी युनायटेड क्लब कडून खेळणाऱ्या या सर्व सात मुलींचे वडील शेतकरी आहेत.