४०० वर्षाच्या जुन्या बेटावर घेता येणार निवासाचा आनंद

अमेरिकेतील ४०० वर्षे जुन्या बेटावर पहिले हॉटेल बांधले गेले असून त्याचे उद्घाटन १ जून रोजी होणार आहे. ‘ग्रॅज्यूएट’ असे नामकरण केलेले हे हॉटेल १८ मजली असून त्यात २४४ रुम्स, दोन हजाराहून अधिक पुस्तके असलेली लायब्ररी आणि अन्य सोयी सुविधा आहेत. हे बेट न्युयॉर्कचे टेक हब म्हणून ओळखले जाते आणि रोज या बेटावर हजारो लोक येतात पण येथे राहण्याची सोय नव्हती. या हॉटेल मुळे आता येथे निवासाची सोय झाली असून हे बेट पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

१६०० च्या आसपास हे बेट वसविले गेले तेव्हा ते नेदरलंडच्या ताब्यात होते. त्याला ब्लॅकवेल आयलंड म्हणले जात असे. १६३७च्या सुमारास मुळच्या अमेरिकन लोकांनी ते खरेदी केले. १९५० मध्ये या बेताचे नाव अमेरिकेचे ३२ वे अध्यक्ष फ्रँकलीन डी रूझवेल्ट यांच्यावरून रुझवेल्ट आयलंड असे ठेवले गेले.

३.२१ किमी लांबीच्या या बेटावर भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. जुन्या ट्राम मधून प्रवासाची संधी आहे. जगातील सहावे जुने  लाईट हाउस आहे आणि देवी रोगात रुग्णांना जेथे वेगळे ठेवले जात असे ती रूग्णालये आजही पाहायला मिळतात. येथे तुरुंग सुद्धा आहेत.