हा आहे जगातला पहिला जिताजागता रोबोमॅन

तंत्रज्ञानात जगाने फारच वेगाने प्रगती केली आहे पण आजही वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण माणूस बनवू शकलेले नाहीत. मात्र अर्धा माणूस बनविणे त्यांना शक्य झाले आहे. याचे उत्तम उदाहरण आहे ब्रिटन मधील वैज्ञानिक डॉक्टर पिटर स्कॉर्ट मॉर्गन. त्यांनी स्वतः मध्येच अनेक बदल घडवून स्वतःला रोबोमॅन बनवून घेतले आहे आणि असा जिताजागता रोबो बनून जगापुढे नवे उदाहरण पेश केले आहे.

६२ वर्षीय डॉक्टर पिटर, मोटर न्युरोन नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. यामध्ये माणसाच्या शरीरातील मांसपेशी किंवा स्नायू नष्ट होतात. शरीरातील अवयव काम करण्याचे बंद करतात. पिटर यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञानाची मदत घेऊन स्वतःला कसे जिवंत ठेवता येते त्याचे उदाहरण दिले आहे. रोबोटिक्सचा वापर करून त्यांनी स्वतःच्या जीवनाला नवा आकार दिला आहे.

आता पिटर मशीनच्या सहाय्याने सर्व कामे सहज करू शकतात. २०१७ मध्ये त्यांना मोटर न्युरोन झाल्याचे निदान झाले आणि २०१९ मध्ये त्यांनी स्वतःला अर्धा माणूस आणि अर्धा रोबो अश्या स्वरुपात बदलून घेतले. त्यांनी त्यासाठी अनेक अविश्वसनीय शोध लावले. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी देहबोली सांगण्याचे तंत्र विकसित केले तर आय ट्रॅकिंग तंत्राने अनेक संगणकावर नियंत्रण कसे करता येते हे दाखवून दिले आहे.

अर्थात पिटर श्वासोच्छवासाठी व्हेंटिलेटरवर अवलंबून आहेत. त्यांना रोबोमॅन बनण्याची प्रेरणा सायन्स फिक्शन कॉमिक कॅरेक्टर सायबोर्ग वरून मिळाली. सायबोर्ग हे अर्धा माणूस आणि अर्धा रोबो असे कॅरेक्टर आहे.