रोनाल्डोने रागाने फेकलेल्या आर्मबँडला लिलावात मिळाले ७५ हजार डॉलर्स

काही दिवसांपूर्वी सर्बिया आणि पोर्तुगाल मध्ये फिफा वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात पोर्तुगालचा कॅप्टन क्रिस्तियानो रोनाल्डोने त्याचा कॅप्टन आर्मबँड रागाने मैदानावर फेकला होता मात्र याच आर्मबँड मुळे एका लहान मुलाला जीवदान मिळणार आहे.

हकीकत अशी की सर्बिया पोर्तुगाल यांच्यात झालेल्या या सामन्यात शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना रोनाल्डोने गोल केला पण रेफ्रीनी तो गोल मान्य केला नाही. यामुळे रोनाल्डो चिडला आणि त्याने रागाने हातातला हा बँड कडून मैदानात फेकला आणि रोनाल्डो मैदान सोडून गेला. टीव्ही रिप्ले मध्ये रोनाल्डोने मारलेला बॉल शॉर्टलाईन वरून जात असताना सर्बियाच्या स्टेफानने थांबविल्याचे स्पष्ट दिसले होते. हा सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता.

मैदानात पडलेला हा बँड एका चॅरिटी ग्रुपच्या सदस्याने घेतला आणि त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑनलाईन लिलाव केला गेला तेव्हा या आर्मबँडला ७५ हजार अमेरिकी डॉलर्सची बोली लागली. आता हा पैसा सहा महिन्याच्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरला जाणार आहे.