या रक्तगटाच्या लोकांना होतो सर्वाधिक करोना संसर्ग

करोना संक्रमण जगभरात प्रचंड वेगाने होत असल्याने सध्या हा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. त्यातून काही रोचक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश मधील वाराणसीच्या हिंदू विश्व विद्यालयातील जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर ज्ञानेश्वर चौबे आणि त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनात एक रोचक बाब समोर आली आहे.

या टीमने १८ ते ६५ वयोगटातील ५०९ लोकांच्या रक्त आणि अँटीबॉडिजचे परीक्षण केले. यात ३६ टक्के लोक एबी पोझिटिव्ह होते. त्यात असे दिसून आले की ज्यांचा रक्तगट एबी पोझिटिव्ह आहे त्यांना करोनाचा सर्वाधिक संसर्ग होतो पण विशेष म्हणजे त्यांच्यात करोनाची लक्षणे दिसत नाहीत तसेच त्यांच्यापासून दुसऱ्यांना करोनाचा संसर्ग होत नाही. ए आणि बी रक्तगट असलेल्या लोकांच्या तुलनेत एबी रक्तगट असणाऱ्यांना करोना संसर्ग होण्याचे प्रमाण २० पट जास्त आहे तर हेच प्रमाण ओ रक्तगट असणाऱ्यांच्या तुलनेत १५२ पट जास्त आहे. पण एबी रक्तगटाच्या लोकांना करोना संसर्ग झाला असला तरी त्यांच्याकडून हे संक्रमण दुसऱ्यांकडे जाण्याचे प्रमाण नगण्य आहे.

चौबे म्हणाले एबी रक्तगटाच्या ब्लड जीन्सचे विश्लेषण केल्यावर असे दिसले की क्रोमोसोम म्युटेशन या लोकात जास्त आहे त्यामुळे त्यांच्यापासून दुसऱ्या लोकांना संसर्ग होण्याचा धोका खुपच कमी आहे. या रक्तगटाच्या लोकांमध्ये आरएस ५०५९२२ नावाच्या म्युटेशन मुळे करोनाची लक्षणे दिसत नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही