मनीमाऊ म्हणजे मांजराबद्दल विशेष मनोरंजक माहिती

billi
अनेक लोक पाळीव प्राणी पाळतात आणि जगभरात कुठलाही देश अथवा नागरिक त्याला अपवाद नाहीत. या पाळीव प्राण्यात सर्वाधिक पाळला जाणारा प्राणी म्हणजे मांजर. मनी माऊ, वाघाची मावशी अशी अनेक नावे तिला दिली जातात आणि एखाद्या कामाला जात असताना रस्त्यात मांजर आडवे गेले तर काम होत नाही असा अनेकांचा विश्वास आणि अनुभव आहे असे सांगितले जाते.

या मांजराविषयी काही मनोरंजक माहिती देत आहोत. मांजर हा एकमेव असा पाळीव प्राणी आहे जो दिवसातील २/३ वेळ म्हणजे १६ तास झोपू शकतो. बरेच वेळा मांजरे झोपली असल्याचे आपण पाहतो ते त्यामुळेच. मांजराला पाण्यात ओले होणे मानवत नाही आणि आवडत नाही कारण त्यामुळे त्याला शरीराची हालचाल करणे अवघड होते. मांजर जे मियाव असा आवाज काढते तो फक्त माणसाशी संवाद साधताना असतो. मांजरे एकमेकांसाठी मियाव असा आवाज काढत नाहीत.

cats
माणसाच्या शरीरात २०६ हाडे असतात तर मांजराच्या २३०. माणसापेक्षा वास घेण्याची क्षमता मांजरात अधिक असते. कंपनांची जाणीव मांजराला अगोदर होते त्यामुळे भूकंप होणार असेल तर त्याची खबर मांजराला १० मिनिटे अगोदर लागते. माणसाचे हृदय मिनिटाला ७२ वेळा धडकते तर मांजराचे ११० ते १२० वेळा धडकते. ६५ मीटर उंचीवरून पडूनही मांजराला लागत नाही कारण त्याचे शरीर लवचिक असते आणि त्याच्या पायांना कुशन असतात. त्यामुळे मांजर नेहमी पायावर पडते. त्याची ऐकण्याची शक्ती कुत्र्यापेक्षा अधिक असते.

mani
मांजराचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात त्यामुळे रात्रीही त्याला स्पष्ट दिसते मात्र त्याला रंगज्ञान नसल्याने गवताचा रंग लाल दिसतो. मांजराला गोडाची चव कळत नाही. त्याच्या डाव्या आणि उजव्या मिशीवर १२-१२ केस असतात. त्याला जबडा उजवीकडे आणि डावीकडे हलविता येत नाही त्यामुळे मांजर मोठे मोठे घास खाऊ शकत नाही. मांजरी उजवा पंजा अधिक वापरते तर बोका डावा पंजा अधिक वापरतो. मांजराच्या पुढच्या पायाला पाच तर मागच्या पायांना चार बोटे असतात. मांजराला फक्त पायाच्या पंजावर घाम येतो. दुध पिऊन मांजराला गॅसेस होतात.

sleep
इजिप्त मधील एक देवी मांजराचे तोंड आणि माणसाचे शरीर या स्वरुपात आहे. प्राचीन इजिप्त मध्ये मांजर मेली तर लोक डोक्याच्या भुवया भादरून शोक व्यक्त करत असत. २४ मांजरांची कातडी काढली तर एक फर कोट तयार होतो. आशियात दरवर्षी ४० लाख मांजरे माणसांकडून खाल्ली जातात. मांजर त्याचे शरीर जिभेने चाटून स्वच्छ करते आणि हे काम दिवसातून कतीतरी वेळ सुरु असते. मांजराला एकावेळी ४ ते ६ पिले होतात. त्याचे सर्वसाधारण आयुष्य १२ ते १५ वर्षाचे असते. मांजराची किडनी समुद्राचे पाणी फिल्टर करू शकते त्यामुळे माणूस समुद्राचे पाणी पिऊ शकत नसला तरी मांजर पिऊ शकते. मांजराची लघवी अंधारात चमकते.

Leave a Comment