प्रतिक्षा संपली…! पांडूने पाहिली शेवंताची पहिली झलक


झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुरु होऊन काही दिवस उलटले असले तरी, शेवंताला पाहण्याची सर्व प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने या मालिकेच्या आधीच्या भागात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यामुळे शेवंताला मालिकेच्या तिसऱ्या भागात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


यातच शेवंता कधी भेटीला येणार हे झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे. शेवंताच्या डोळ्यांचा एक फोटो झी मराठीने शेअर केला आहे. यात ती कधी येणार हे सांगण्यात आले आहे. पण यासाठी हा फोटो निरखून पाहणे गरजेचे आहे. हा फोटो जर तुम्ही निरखूवन पाहिलात तरच तुम्हाला शेवंता कधी येणार हे जाणून घेता येणार आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये झी मराठीने म्हंटलं आहे. शेवंता येणार पण कधी ते जाणून घेण्यासाठी फोनचा brightness वाढवा. तर तुम्हाला फोनचा ब्राईटलेस वाढवल्यावर कळेल शेवंता कधी येत आहे. या फोटोचा ब्राईटनेस वाढवल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल. तसेच शेवंताच्या अनेक फॅन्सचा हिरमोड झाला असेल. कारण या फोटोतून एप्रिल फूल बनवण्यात आले असल्यामुळे प्रेक्षकांना शेवंता येण्याचा नेमका दिवस अजून कळालेला नाही.

असे असले तरी लवकरच चाहत्यांच्या भेटीला शेवंता या मालिकेतून येणार आहे. कारण शेवंतानेच म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने तिच्या इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना ती येत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर मालिकेमध्ये शेवंताची एक झलकही चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. शेवंता पांडूला आरश्यामध्ये दिसल्यामुळे लवकरच येत्या भागात शेवंता प्रत्यक्ष भेटीला येणार आहे.