राजधानी दिल्लीत कोरोनाची चौथी लाट, पण लॉकडाऊनचा विचार नाही – अरविंद केजरीवाल


नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याच पार्श्वभूमीवर आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलाविली होती. दिल्लीत लॉकडाऊन केले जाणार नाही, असे संकेत या बैठकीतनंतर अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. देशातील कोरोनाची दुसरी लाट असू शकते, पण दिल्लीसाठी कोरोनाची चौथी लाट आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब असली तरी घाबरून जाण्याची गरज नाही. सरकार संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचे केजरीवाल म्हणाले.

जी काही पावले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उचलली पाहिजेत, ती उचलली जात असून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत, पण यावेळी पूर्वीच्या प्रकरणांपेक्षा ही कोरोनाची प्रकरणे कमी गंभीर आहेत. मृत्यू कमी होत आहेत आणि आयसीयूमध्येही रुग्णांना कमी दाखल केले जाते. जवळपास 50 टक्के रुग्ण आज रुग्णालयात जात आहेत. लोक होम आयसोलेशनमध्ये चांगले उपचार घेत आहेत. सरकार कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करण्याचा विचार करत नसून भविष्यात आवश्यकता असल्यास लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

रुग्णालयांमध्ये किती व्यवस्था आवश्यक आहे. रुग्णवाहिका, रुग्णालये, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि आयसीयू यावर चर्चा केली. संपूर्ण योजना तयार आहे. खाजगी व सरकारी रुग्णालयात बेड कधी वाढवल्या जातील. कोरोनाचा प्रसार होण्यापासून कसा रोखावा. चाचण्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन वेगाने केले जात आहे. कंटेनमेंट झोन तयार करुन रोगाचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आज झालेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल म्हणाले.

1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या पुढील लोकांना लस घेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम कम्युनिटी सेंटर, शाळांमध्ये सुरू करू शकतो. योग्य ती व्यवस्था त्याबाबत राज्य सरकार करेल. जिथे आपण ही लस द्याल तिथे रूग्णवाहिका, प्रथमोपचाराची व्यवस्था केली जाईल. आता 4 महिने झाले आहेत, फारसा त्रास होत नाही. या बाबीकडे केंद्र सरकार लक्ष देईल, राज्य सरकारांना त्यांच्या स्तरावर लसीकरण करण्यास केंद्र सरकार परवानगी देईल, अशी आशा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.