फक्त सात ते आठ दिवस पुरेल एवढाच राज्यात रक्तसाठा! जितेंद्र आव्हाडांचे रक्तदान करण्याचे आवाहन


मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. तसेच आव्हाडांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. अनेक महाविद्यालये आणि एनजीओ लॉकडाऊनच्या काळात बंद असल्यामुळे रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. तर सध्या राज्यात आता सात ते आठ दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध असल्यामुळे तरूणांना रक्तदान करण्याचे आवाहन आव्हाडांनी केले आहे.

आपण ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ असे म्हणत असतो. या वाक्याला प्रेरित होऊन आपण रक्तदानही करत असतो. पण राज्यात गेल्या काही महिन्यापासून रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आता राज्यावर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या काही महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरे न झाल्याने पुढील 7 ते 8 दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे आणि ही बाब अत्यंत काळजीची आहे.

राज्यावर कोरोनाचे संकट ओढावण्यापूर्वी दोन ते अडीच हजार रक्तदान शिबीरे दर महिन्याला आयोजित होत होती. पण कोरोनाकाळात यात घट झाली आहेत. या कालावधीत 50 टक्के रक्तदानात घट झालेली आहे. पूर्वी 50 टक्के सामान्य नागरिक रक्तदान करायचे, तर 15 टक्के कॉलेज व 35 टक्के कॉर्पोरेटमधून रक्तदान शिबीरातून रक्त उपल्बध व्हायचे. पण कोरोनामुळे गेल्या काही महिन्यात ते मिळाले नाही.