अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण


राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गहिरे होत असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. कोरोनाच्या विळख्यात अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण सापडत आहेत. त्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आलिया सध्या होम क्वारंटाइन आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर आलियाने स्टोरी पोस्ट करत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी होम क्वारंटाइन आहे. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. तुम्ही देखील तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, या आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.

आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख या कलाकारांची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्या पाठोपाठ आता आलिया भट्टला देखील कोरोनाची लागण झाली आहे.