पबजी मोबाईल लाईट घेणार निरोप

भारताने पबजी मोबाईल आणि लाईट व्हर्जनवर सप्टेंबर मध्येच बंदी घातल्यानंतर आता हा बॅटल रॉयल गेम सर्व जगभर बंद होणार आहे. कंपनीने या संदर्भात केलेल्या घोषणेत जागतिक स्तरावर पबजी मोबाईल लाईट बंद केला जात असल्याचे म्हटले आहे. मात्र तो का बंद केला जातोय याचा खुलासा केलेला नाही.

पबजी मोबाईल लाईट हे लो एंड व्हर्जन २०१९ मध्ये एन्ट्री लेव्हल डिव्हाईससाठी लाँच केले गेले होते. भारताने पबजी मोबाईलवर गेल्या २ सप्टेंबरला बंदी घातली होती. डेव्हलपर क्राफ्ट्न यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर एक मेसेज पोस्ट केला आहे. त्यात २९ एप्रिल रोजी पबजी एक इतिहास बनेल असे म्हटले आहे. अर्थात पबजी लाईट बंद करताना दुःख होत असल्याचे सांगून ते म्हणतात, जगभर लाईट व्हर्जन ला खूप सपोर्ट मिळाला. करोना काळात या गेमने लोकांच्या मनोरंजनाचे काम केले. अर्थात युजर्स पबजी लाईट व्हर्जन फेसबुक वर खेळू शकणार आहेत.

या गेमने कमी वेळात खूप प्रसिद्धी मिळविण्याची कामगिरी बजावली आहे. पबजी ६० कोटी डाऊनलोड केले गेले असून जगात त्याचे ५० कोटी प्लेयर्स आहेत.