एलोन मस्कच्या गर्लफ्रेंडची अजब इच्छा
स्पेस एक्सचे सीईओ आणि जगातील श्रीमंत यादीत आघाडीवर असलेले टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क यांच्या गर्लफ्रेंडने अजब इच्छा व्यक्त केली आहे. व्यवसायाने सिंगर असलेली, एलोन यांची मैत्रीण ग्रिमस चे सुद्धा एलोन प्रमाणेच मंगळ ग्रहावर राहण्याचे स्वप्न आहेच पण तिला मंगळावरच्या लाल मातीतच मृत्यू यावा अशी इच्छा आहे. तिने ही इच्छा अश्या वेळी व्यक्त केली आहे जेव्हा अब्जाधीश एलोनच्या स्पेस एक्सचे स्टारशिप रॉकेट सलग तिसऱ्या वेळी उड्डाण करण्यात असफल ठरले आहे.
ग्रिमस आणि एलोन यांना एक मुलगा असून त्याचे नाव X/E-A-XII असे आहे. ग्रिमसने तिच्या इन्स्टाग्राम अकौंटवर म्हटले आहे मंगळाच्या लाल मातीत मरण्यासाठी मी तयार आहे. त्यापूर्वी एका प्रश्नाला उत्तर देताना तिने वयाच्या ५० व्या वर्षी मंगळावर जाण्याची तयारी दाखविली होती. त्यावेळी मंगळावर मानवी वसाहत वसविण्यात मदत करण्याची तिची इच्छा आहे. मस्कने तिसऱ्या महायुद्धानंतर मंगळावर मानवी वसाहती तयार असतील अशी घोषणा केली आहे.