परंपरा मोडून देओल परिवारातील राजवीर बॉलीवूड डेब्यू करणार

बॉलीवूड दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओल यांचा मुलगा राजवीर बॉलीवूड डेब्यूसाठी तयार झाला आहे. विशेष म्हणजे देओल घराण्याची परंपरा मोडून राजवीर याचे बॉलीवूड पदार्पण होत आहे. धर्मेंद्र यांनीच राजवीरच्या बॉलीवूड पदार्पणाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

आजपर्यंत धर्मेंद्र यांच्यानंतर सनी, बॉबी आणि करण या देओल घराण्यातील कलाकारांनी बॉलीवूड प्रवेश केला तो घरच्या चित्रपटातून. राजवीर ही परंपरा खंडीत करत आहे. तो राजश्री प्रोडक्शनच्या ‘लव स्टोरी’ या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट सुरज बडजात्या यांचा मुलगा अविनाश दिग्दर्शित करणार असून त्याचाही हा पहिलाच चित्रपट आहे.

राजवीरचा मोठा भाऊ करण याने सनी देओल दिग्दर्शित दिल के पास पास या चित्रपटातून करियरची सुरवात केली होती. सनी देओल याचा पहिला चित्रपट बेताबची निर्मिती धर्मेंद्र यांनीच केली होती तसेच बॉबी देओल यांच्या पहिल्या बरसात चित्रपटाची निर्मिती सुद्धा धर्मेंद्र यांनीच केली होती.

धर्मेंद्र यांनी राजबीरच्या बॉलीवूड डेब्यू बद्दल सोशल मीडियावर लिहिताना,’ राजवीर ला सिनेमा जगाचा परिचय. या दोन मुलांना प्रेम, स्नेह द्या अशी विनम्र प्रार्थना, शुभेच्छा आणि आशीर्वाद’ असा मजकूर लिहिला आहे. सनी देओल आणि बॉबी देओल यांनी राजवीर चे बॉलीवूड मध्ये स्वागत असल्याचे म्हटले आहे.