नासाने मंगळ मोहिमेचा डेटा केला इस्रो बरोबर शेअर करणार
अमेरिकी अंतराळ संस्था नासाने त्यांच्या मंगळ मोहिमेचा डेटा भारतीय अंतराळ संस्था इस्रो बरोबरच चीन, युएई व युरोपीय अंतराळ संस्थेबरोबर शेअर केला आहे. मंगळ मिशनवर सध्या भारताचे मंगळयान तसेच अन्य देशांची याने मंगळाच्या कक्षेत प्रदक्षिणा करत आहेत तर नासाचे लँडर गेल्या महिन्यात मंगळावर उतरले आहे. मंगळ कक्षेत यानांची गर्दी झाल्याने आपसात टक्कर होण्याचा धोका निर्माण झाला असल्याने नासाने वरील सर्व देशांबरोबर मोहिमेसंदर्भातील डेटा शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे.
हॉंगकॉंग आधारित साउथ चायना मॉर्निंग पोस्टने नासाचा हवाला देऊन हे वृत्त प्रसिध्द केले आहे. त्यानुसार यानांची आपसांत टक्कर होण्याचा धोका आणि मोहिमेची सुरक्षा या साठी इस्रो, युएई, युरोपियन अंतराळ संस्था आणि चायना नॅशनल स्पेस ऑर्गनायझेशन बरोबर डेटा आदानप्रदान केला जाणार असल्याचे म्हटले आहे. भारताचे मंगळयान २०१४ पासून मंगळाभोवती प्रदक्षिणा घालत आहे.
चीनचे तियानमेन-१ मंगळ प्रदक्षिणा करत आहे आणि मे जून मध्ये ते मंगळावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. युएई चे होप अंतराळ यान मंगळाभोवती चकरा मारत आहे तसेच युरोपियन अंतराळ संस्थेची दोन याने मंगळाभोवती फिरत आहेत.