डिसलाईक बटण हटवणार युट्यूब


सर्वात मोठे व्हिडीओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या युट्यूबवर व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. आता याच युट्यूबने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक फिचर हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हिडिओ बनवणाऱ्यांना मोठा फायदा होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

यासंदर्भात द वर्जने (The Verge) दिलेल्या एका वृत्तानुसार, यूट्यूबवरून डिसलाईकचे बटण काढले जाऊ शकते. यासाठी कंपनीने तयारी देखील केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे बटण हटविल्यामुळे यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना थेट फायदा होईल. या संदर्भात यूट्यूबनेही ट्विट केले आहे.

Like, Dislike, Share आणि Download असे पर्याय युट्यूबच्या प्रत्येक व्हिडीओच्याखाली होते. आपला व्हिडीओ किती जणांना आवडला, नाही आवडला हे क्रिएटर्सला या टूल्समुळे कळते. डिसलाईकचे बटण हे थेट फि़डबॅक देते. केवळ फीडबॅकसाठी लाइक आणि नापसंत यासारखे बटण युट्यूबने तयार केली होती, पण डिसलाईक बटणाचा गैरवापर होताना दिसत असल्यामुळे युजर्स एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लक्ष्य करण्यासाठी हे बटण वापरु लागले आहेत. डिसलाईकचे बटण हे विरोध दर्शवण्याचे साधन म्हणून वापरले जाऊ लागले आहे. डिसलाईकचे बटण हटवल्यामुळे व्हिडिओ बनवणाऱ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. व्हिडीओ बनवणाऱ्यांना त्यांच्या सिस्टिममध्ये खरा अभिप्राय मिळेल, अशी आशा कंपनीला आहे.