दिलासादायक; आता ३० जूनपर्यंत लिंक करु शकता तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी


नवी दिल्ली : जर पॅन कार्ड आतापर्यंत तुम्ही आधारशी लिंक केले नसेल, तर तुमच्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तुम्ही आता ३० जून, २०२१ पर्यंत पॅन कार्डशी आधार लिंक करु शकता.

आज पॅन आधारला लिंक करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आज अचानक आयकर विभागाच्या संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर लोक लिंक करण्यासाठी आले. परिणामी आयकर विभागाचा सर्व्हरच डाऊन झाला. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली. जर आज पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसते, तर उद्यापासून १००० रूपयाचा दंड होणार होता. पण सर्व्हरच ठप्प झाल्यामुळे अनेकांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर आता केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत वाढवून दिली आहे.